‘तो’ शिवसेनेचा इतिहास आहे म्हणत माजी शिवसेना खासदाराने उडवली खिल्ली

मुंबई :

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज असल्याची माहिती समोर आली. या स्टार कॅम्पेनर यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार नितेश राणे यांनी ‘महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे’, असे म्हणत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

राणे म्हणाले की, ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. राणे म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्यांनी स्पॉट नाना अनिल परब यांच्यावर काल पुरावे देऊन आरोप केले. आरोप असा होता की मंत्री अनिल परब यांनी सरकारची जमीन ढापली व तिथे स्वतःचं ऑफिस बनवलं. ते ऑफिस अनधिकृत आहे हे सिद्ध करून सुद्धा ऑफिस तसचं आहे. महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडे लायसेन्स आहे… लुटत रहा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here