म्हणून भाजप प्रवक्त्याने केली जहरी टीका; सोनियापासून रियापर्यंत ‘त्या’ सगळ्यांचा ब्लडग्रुप एकच…

दिल्ली :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर चर्चेत आहे. या प्रकरणात अडकलेली सुशांतची अत्यंत जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती काही दिवसांपासून अटकेत होती. काल तिला बेल मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली आहे. ‘सोनिया बेलवर, राहुल बेलवर, चिदंबरम पासुन सगळे छोटे मोठे नेते बेलवर, आता रिया ही बेलवर.. सगळ्यांचा ब्लडग्रृप एकच.. बी निगेटिव्ह’, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.   

रियाला बेल मंजूर झाल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही भाजपला डिवचले, टोले लगावले. समाजमाध्यमांवर दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपापली बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. वाघ यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आकाश हंबीर यांनी म्हटले आहे की, कुणी बेलवर असो वा अन्य कशावर ,तुम्ही मात्र सतरंजी सोडू नका. तुम्ही कायमच सतरंजीवर राहा.

अभिजित काळभोर यांनी म्हटले आहे की, तडीपार(अमित शहा) कशावर आहे? आडवाणी, फडणवीस आणि फेकु मोदी कशावर आहेत. बेल वरच होते का नाही?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here