‘त्यांनी’ मोदींना म्हटलेय ‘रोबर्ट शेठ’; अमर-अकबर-अँथनीच्या मुद्यावर कॉंग्रेसने दिले भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर

राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय असल्यामुळे त्यांचे तेच पडतील असा टोला भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याला कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष शेठ असेच म्हणतात. हाच त्यामध्ये मुद्दा सावंत यांनी आणला आहे. एकूणच यामुळे हा चित्रपट आणि त्यातील पात्र पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आम्हाला महाराष्ट्रातील सरकार पाडायचे नाही. अमर, अकबर आणि अँथनीच राज्यात सरकार असून, या तिघांचे पायात पाय असल्यामुळे त्यांचे तेच पडतील छोट्या शेतकऱ्यांचे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध  होत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here