‘पोलिसांना माझं नाव सांगा,,’; अजितदादांची ती ऑडीओ क्लिप व्हायरल, पहा कोणता भाजप नेता आहे त्यामध्ये रडारवर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ऑडीओ आणि व्हिडिओ क्लिप रोज व्हायरल होत असतात. आताही त्यांची एक अशीच क्लिप जोरात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजितदादांनी एकाला सोलापूर येथील भाजप नेत्यावर गुहा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्यानं उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन केला होता. त्याची ही क्लिप आहे. त्यामध्ये त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न देणारे भाजप नेते कल्याण काळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

अजितदादांच्या या सल्ल्यानंतर शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्यात कारखान्याच्या प्रश्नासाठी मागे पुढे फिरणाऱ्या कल्याण काळेंच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेते कल्याण काळे यांचे पंढरपूर तालुक्यात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सीताराम महाराज खर्डी येथे खासगी असे दोन साखर कारखाने आहेत. एफआरपीची रक्कम थकीत आहे तर चालू हंगामात ही कारखाने सुरु होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे.

अशावेळी ही महत्वाची घटना घडली आहे. तुम लढो हम है साथ मे असाच संदेश याद्वारे अजितदादांनी संबंधित शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ताकद वाढली आहे. चव्हाण यांनी शेतकऱ्यांची कोण दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त केल्यावर अजित दादा म्हणाले की,  ‘पोलिसांना माझं नाव सांगा’. त्याचे कौतुक होत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here