राधाकृष्ण विखेंचा धक्कादायक खुलासा; ‘ती’ गोष्ट आम्हाला ‘त्यांनी’ कधीच सांगितली नाही

अहमदनगर :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह लागावा कारणी’ या आत्मचरित्राचे लवकरच प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लोणीला येणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य नसल्याने व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून आता या आत्मचरित्राचे प्रकाशन होईल. ‘पंतप्रधान मोदी आणि आमच्या वडिलांचे मित्रत्वाचे संबंध होते. मात्र, आमच्या वडिलांनी ही गोष्ट आम्हाला कधीही सांगितली नव्हती’, असा धक्कादायक खुलासा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

त्यांची मैत्री असल्याचे माहिती आम्हाला स्वतः मोदींनी सांगितली, असेही पुढे बोलताना विखे पाटील यांनी सांगितले. काही काळ सोडता संपूर्ण राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमध्ये घालवलेल्या डॉ.बाळासाहेब विखे पाटलांनी पुस्तकात काय खुलासे केलेले आहेत, भाजप आणि कॉंग्रेसविषयी काय भाष्य केले आहे, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल. डॉ.बाळासाहेब विखे पाटलांनी आत्मचरित्रात केलेले भाष्य आता भाजपमध्ये असलेल्या विखे पिता-पुत्रासाठी अनुकूल असेल काय, हेही पाहणे महत्वाचे आहे.

‘पंतप्रधान मोदींशी असलेले मित्रत्वाचे संबध आमच्या वडिलांनी आम्हाला कधीही सांगितले नव्हते. पण निमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर पंतप्रधानांनीच या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विखे पाटील प्रश्नांवर परखडपणे मत मांडत राहिले. सतेला कधी कधी भुलले नाहीत. त्यांना नमन करण्यासाठी लोणीलाच येण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली होती’, अशीही माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.        

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here