आता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज; पहा गौसिया शेख यांनी असे का म्हटलेय

हाथरस येथील पीडिताला न्याय मिळावा, यासाठी पीआरपीच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमिन शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये बोलताना गौसिया शेख यांनी म्हटले आहे की, देशात आता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज आहे.

बोर्डाचे माजी उपाध्यक्ष शेख, गौसिया शेख, जिल्हा सचिव अरुण जगताप, शहराध्यक्ष परशुराम दोडमनी, कार्याध्यक्ष रजाक शेख, युवाध्यक्ष कयूम शेख, कॉंग्रेसचे गफूर शेख यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली.  मेणबत्ती प्रज्वलित करीत मृत पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करताना पोलीस मित्र संघटनेचे आयूब शेख, राजू कागडा, संदीप भुंम्बक, मौलाना अबुल कलाम वेल्फेअरचे हाजी रसूल गुलाम, अहमद पिरजादे, जुबेर सय्यद, प्रशांत येळवंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

 गौसिया शेख यांनी म्हटले आहे की, भाजपच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोणतेही उपाययोजना किंवा संरक्षण देत नाही. बेटी बचाव, देश बचाव असा नाराच लावतात त्यामुळे आता कॅंडल मोर्चा नाही, योगी सरकारच्या विरोधात सॅंडल मोर्चा काढावा लागेल.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here