हाथरसचे आरोपी निर्दोष; म्हणून भाजपच्या नेत्यांनी केली त्यांना सोडण्याची मागणी

हाथरस प्रकरणावर बोलताना उत्तरप्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील भाजपचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.

श्रीवास्तव यांनी मागणी केली आहे की, ही मुले निर्दोष असून, त्यांना वेळेत सोडले गेले नाही, तर मानसिक त्रासाला सामोर जावे लागेल. त्याचे गेलेले वय कोण परत करणार आहे? त्यांना नुकसानभरपाई सरकार देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे.

सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात श्रीवास्तव यांनी मुलीचे आरोपीशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीवास्तव यांनी हाथरस पीडितेबरोबरच बलात्कारांच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या पीडितांविषयीही संतापजनक व्यक्तव्य केले आहे.

त्यांनी म्हंटले आहे की, मुलाला बाजरीच्या शेतात मुलीनेच बोलावले. कारण त्यांच्यात प्रेमप्रसंग होता. सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरही ही गोष्ट आली आहे. मुलीला पकडले गेले असेल. शेतामध्ये असेच होते. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे. कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचे बोललो नाही. पण मुले दोषी नाही, मुलगी दोषी आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here