‘त्या’ बैठकीलाही उदयनराजे राहिले गैरहजर; पहा काय झालाय त्यामध्ये महत्वाचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत बोलावलेल्या बैठकीस भाजपचे खासदार  छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहिले. त्यांनी रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा रद्द न केल्यास उधळून लावण्याची घोषणा केली आहे. तर, या महत्वपूर्ण बैठकीस भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले हे मात्र गैरहजर राहिले. त्यांनी यावेळी अनुपस्थित राहण्याच्या मुद्यावर काहीही माहिती दिलेली नाही.

साताऱ्यात बैठक होण्याच्या बातम्या येत असतानाच ही महत्वाची बैठक मुंबईत झाली. नवी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य स्तरीय बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उदयनराजे भोसले या बैठकीला अनुपस्थित राहिले. पुढील आंदोलनाच्या दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील जिल्हा समन्वयक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये आणि रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा स्थगित करण्यात यावी, जर ही परीक्षा स्थगित झाली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, परीक्षा उधळून लावण्यात येईल, अशा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here