ब्रेकिंग : पुण्यामध्ये २० कोटींचे अमलीपदार्थ पकडले..!

पुणे जिल्ह्यातील  पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेल पिंपळगावमध्ये बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर २०२०) दुपारी अमलीपदार्थ बाळगलेल्या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २० कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

यामध्ये चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here