स्मृती इराणी यांनी दिला मोदींच्या भाजप आमदाराला घराचा आहेर; पहा काय म्हटलेय त्यांनी

उत्तरप्रदेश येथील हाथरस प्रकरणामुळे देशातील वातावरण तापले आहे. अशा दुर्दैवी घटना दुर्दैवाने देशात घटना सगळीकडे घडतात मात्र पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली क्रूरता भयानक असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी भाजपचे नेते यापारकरणी उलटसुलट वक्तव्य करीत आहेत. त्यांनाच या पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घराचा आहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपची वाढ होत आहे. मात्र, संवेदनशील मुद्यावर या पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आणखी वातावरण बिघडवणाऱ्या असतात. आताही हाथरस प्रकरणावरून बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ‘सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील’ असे म्हटले होते.

सिंह यांच्या या वक्तव्यावरून देशभरात आणि जागतिक क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणानंतर काही जण मुलींना उपदेश देत आहेत. ते म्हणातात की, मुलींना संस्काराची गरज आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की कुटुंबासाठी मुलगा आणि मुलगी हे एक असून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, ‘मी केवळ एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतोय आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात.’

इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणाने मी खूप अस्वस्थ झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठित केली. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपवले. लवकरच त्याचे सत्य समोर येईल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here