ब्रेकिंग : म्हणून सीबीआयच्या माजी संचालकांनी केली आत्महत्या..!

सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआय यांचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. शिमला (हिमाचल प्रदेश) येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी आत्महत्या केली आहे.

घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या मृत्यूबाबतचं वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक पोलिसांनी याचा सर्व अंगाने तपास सुरू केला आहे. अश्विनी कुमार लिहिलेली चिठ्ठी आढळली असून जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात  असल्याचे नमूद केले आहे.

एरव्ही अत्यंत कार्यमग्न असलेले अश्विनीकुमार यांना मागील सहा महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही पोलीस इतर शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत. त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, अश्विनी कुमार हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. घरी परतल्यावर ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here