करोनाला हरवण्यासाठी मारला जाणार ‘हा’ मास्टर स्ट्रोक; पहा काय करणार आहे सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांनी दिलेल्या संदेशाची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय नागरिकांची असलेली तत्परता वादातीत आहे. पदावरून ठोस कार्यक्रम देऊन देशाला एक ठेवणाऱ्या मोदी यांनी आता करोनाला हरवण्यासाठी मास्टर स्ट्रोकचे नियोजन केला आहे.

पंतप्रधान मोदी कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार आहेत. कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत.

भारतात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आलेयत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.

सध्या करोना विषाणूवर कोणतीही लस नाही. अशावेळी काळजी घेणे हाच यावरील ठोस आणि कार्यक्षम उपाय आहे. याचेच भान देशातील जनतेला राहिलेले नाही. त्याचीच आठवण करूं देण्यासाठी मोदीजी याला जनआंदोलनचे स्वरूप देण्यासाठी हा शपथविधी कार्यक्रम राबवणार आहेत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here