करोना झाल्यावर ट्रम्प यांना सुचली उपरती; पहा कोणती घोषणा करून टाकलीय त्यांनी

राजकीय नेतृत्व हे जनतेचे प्रतिनिधित्व करीत असते. जनताच त्यांना निवडून देत असते. त्यामुळे त्यांचे कर्तुत्व असो की चुका या सामुहिक जबाबदारीच्या असतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही नवीन अमेरिका उभे करायला जनतेने निवडून दिले होते. त्याच ट्रम्प यांना करोना झाल्यावर मग जनतेच्या दुःखाची आठवण झाली आहे.

करोना झाल्यावर रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा व्हाईट हाउसमध्ये आल्यावर त्यांच्या डोक्यात काही महत्वाचा प्रकाश पडला आहे. त्यावेळी त्यांनी नेहमीच्या थाटात चीनवर याचे संपूर्ण खापर फोडले आहे. ते काही चूकही नाही. मात्र, नागरिकांना करोना झाल्यावर कोविड १९ साठीचा उपचार मोफत देण्याची त्यांनी आता कुठे घोषणा केली आहे.

त्यांनी ही घोषणा केली असली तरी लागू कधी होणार आणि यापूर्वीच दवाखान्यात पैसे गमावलेल्या मंडळींना कोणता लाभ होणार हे त्यांनी म्हटलेले नाही. निवडणूक सुरू असतानाच त्यांना ही उपरती सुचली आहे. मतदान खेचून घेऊन पुन्हा एकदा अमेरिकेत अध्यक्षपद मिळवण्यासाठीचा त्यांचा हा अट्टाहास असल्याचे म्हटले जात आहे. भारतात ज्या पद्धतीने निवडणुका जिंकायला अनेकांना ऐनवेळी उपरती सुचते आणि नंतर त्याचा विसर पडतो. हा त्यातलाच तर प्रकार नाही ना अशी शंका अनेकांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त केली आहे.

कोरोना झाल्यानंतर जे उपचार अध्यक्ष म्हणून मला मिळाले ते सर्व अमेरिकन जनतेला मी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना राबवणार आहे. कोरोनाचे उपचार घेण्यासाठी आता अमेरिकेतील नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार नाहीत. आतापर्यंत जे काही झाले त्यात प्रशासनाची कोणतीही चूक नाही. चीनचीच ही चूक आहे आणि याची चीन्यांना मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे असा इशाराही त्यांनी ट्विटरवर दिला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here