धक्कादायक : करोनाबाबत WHO ने म्हटलेय ‘हे’; वाचा महत्वाची बातमी

मागील सहा-सात महिन्यांपासून जगावर करोना विषाणू आणि त्यामुळे होणाऱ्या कोविड 19 आजाराचे मृत्यू याचेच संकट आहे. अशावेळी नेमका किती लोकांना करोना विषाणूची बाधा झाली आणि कितीजण बरे झाले याचाही ताळमेळ जुळेनसा झाला आहे. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या आकड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, जगाच्या लोकसंख्येत दर 10 जणांपैकी एकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जगभरातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांमधील 3.5 कोटींपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण संक्रमणाचा हा आकडा प्रत्यक्षात 80 कोटींच्या जवळपास असण्याचा WHOचा अंदाज आहे, असे बीबीसीच्या बातमीत म्हटलेले आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची पहिली घटना चीनमधल्या वुहानमध्ये नोंदवण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत 10 महिन्यांचा कालावधी उलटलाय. पण ही साथ आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट आता सगळेजण या विषाणूच्या सोबतीने जगायला शिकत आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी जगातील किमान 10 टक्के लोक यामुळे बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंत जगभरात किमान 10 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले असल्याचे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीची आकडेवारी सांगत आहे. जगाचा विचार करता अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये संसर्गाची सर्वात जास्त लागण झालेली आहे. यांचा या आकडेवारीत मोठा वाटा आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here