अबब.. त्यांच्याकडे आहे ८,१३३ टन सोने; भारताच्या कित्येक पटीने आहेत ‘ते’ सोने राखून

जगभारत सर्वाधिक सोने परिधान करणारा आणि मिरवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्याकडे महिला, पुरुष यांच्यासह आबालवृद्धांनी सोन्याचांदीच्या वस्तूंना खूप आपलेसे केले आहे. दक्षिण आशियाई देशातील असे सोनेप्रेम जगभरात कुठेही दिसत नाही. तरीही सोने बाळगणाऱ्या देशांमध्ये आपला भारत देश थेट नवव्या स्थानावर आहे.

आपल्याकडे नाही का नवश्रीमंत मंडळी पैसे कमी असतानाही खूप असल्याचे भासवण्यासाठी दागिने घालून मिरवतात. जगभरातही तसाच ट्रेंड आहे. भारताकडे खूप सोने असल्याचे फ़क़्त दिसते. वास्तवात यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो अमेरिका या देशाचाच. जगातील सर्वात श्रीमंत असलेला हा देश आहे. त्यांच्याकडे तब्बल ८,१३३ टन सोने आहे.

तर, भारतातील सोन्याचा साठा आहे फ़क़्त ६५३ टन. जगात दुसऱ्या स्थानावर आहेत जमर्नवाले. होय, जर्मनी या देशाकडे ३ हजार ३६३ टन इतके सोने आहे. तर, २ हजार ४५१ टन इतक्या सोन्याच्या साठ्यासह इटली तिसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या स्थानावरील फ्रांस देशाकडे २ हजार ४३६ टन, पाचव्या स्थानावरील चीनकडे १ हजार ९४८, सहाव्या क्रमांकावर असलेल्या रशिया देशाकडे १ हजार ४० टन आणि जपानकडे ७६२ मेट्रिक टन इतके सोने आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here