कृष्णविवरावर काम करणाऱ्या त्या तिघांना मिळाले नोबेल; वाचा कोण आहेत ते अवलिया

कृष्णविवराचे रहस्य उलगडणारे शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांना यंदाचा ‘नोबेल’ हा जागतिकदृष्ट्या सर्वात महत्वाचा समाजाला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भौतिक शास्त्रासाठी देण्यात येणारा नोबेल आत त्यांना घोषित करण्यात आला. रॉयल स्वीडिश अॅकडेमी ऑफ सायन्सचे सचिव जनरल होरान हॅनसन यांनी पुरस्काराची घोषणा केली. नोबेल समितीने म्हटले आहे की, या  शास्त्रज्ञांनी सुपरमॅसिव्ह आणि कॉम्पॅक्ट वस्तुंच्या संशोधनात नवीन उंची गाठली आहे.

आईनस्टाईन नंतर सापेक्षता सिद्धांतात रॉजर पेनरोज यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांनी सरळ गणितीय पद्धतीचा वापर करून कृष्णविवर हे अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सापेक्षता वादाच्या सामान्य सिद्धांताचा परिणाम आहे, हे सिद्ध केले. कृष्णविवर वास्तवात तयार होते, हे दाखवून दिले आहे.

तर, रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांनी आकाशगंगेच्या ‘मिलकी वे’च्या केंद्रस्थानी सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचा शोध लावला आहे. पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आलेला आहे. सुवर्ण पदक आणि 11 लाख डॉलरहून अधिक रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here