साताऱ्यातील बैठकीत ठरणार आंदोलनाची दिशा; दोन दिवसांत होणार मराठा आरक्षणाची बैठक

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा न टिकल्याने आता समाज पुन्हा एकदा या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यासाठीची राज्यस्तरीय बैठक सातारा येथे पुढील २ दिवसात होणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे हा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देण्यासाठी तयारी केली जात आहे. मात्र, त्यातून हाती काय येणार याचा विश्वास समाजातील नेत्यांना वतात नाही. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता दिशा देण्यासाठी मराठा समाज आंदोलकांनी मोठे पाऊल उचलले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची महत्वाची बैठक होत आहे.

मराठा समाजाला आरक्षण कसे मिळवता येईल, सरकारवर कशा पद्धतीने दबाव टाकता येईल, या वेगवेगळ्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदयनराजे मराठा आरक्षणासाठी काय भूमिका मांडता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण वातावरण तापले आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

‘मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,’ असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. मात्र, असं केल्यास कोर्टात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here