त्यामुळे झुनझुनवालांनी झटक्यात कमावले 339 कोटी; वाचा दणक्यात ग्रोथ देणारी ही बातमी

शेअर बाजारात फ़क़्त दररोज ट्रेडिंग करून पैसे कामाणारे कितीही असोत. मात्र, इन्व्हेस्टमेंट करून शेकडो कोटी कमावलेले खूप मोजके आहेत. अशा हजारो कोटींचे धनी झालेले सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एकाच झटक्यात तब्बल 339 कोटी रुपये कमावले आहेत.

हे खूप शेअर मिळून नाही. तर, एकाच शेअरमध्ये गुंतवणूक करून त्यांनी हे घबाड काही तासात कमावले आहेत. त्या शेअरचे नाव आहे टायटन कंपनी. होय, टाटा ग्रुपच्या या कंपनीद्वारे झुनझुनवाला यांना ही कमाई आज झालेली आहे. टायटन कंपनीचे शेअर मागणीमुळे 6 टक्के इतके वाढल्याने त्यांचे पैसे झटक्यात 339 कोटींनी वाढले आहेत.

मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर 2020) रोजी या कंपनीचे शेअर 1199 रुपयांना होते. तेच आज थेट उच्चांकी 1268 झाले. शेअरचे भाव वाढल्याने यामध्ये गुंतवणूक केलेल्या सगळ्यांचे पैसे 6 टक्के इतके एकाच दिवसात वाढले. त्यात झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 49,050,970 शेअर आहे. त्यांच्या शेअरची काल एकूण किंमत 5881.2 कोटी होती. आज वाढल्याने ते पैसे 6220 कोटी रुपये इतके झाले.

टायटन कंपनीच्या घड्याळे आणि दागिने यांना मागणी वाढत आहे. दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांनी मागणीचा ओर कायम राखला आहे. वस्तूंना मागणी असल्याने या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आणि नव्याने शेअर खरेदी करणाऱ्यांचा विश्वास जोमात आहे. परिणामी सर्वांनाच याचा लाभ होत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here