त्याकडे लागले मार्केटचे लक्ष; उद्या जाहीर होणार TCS चे दुसऱ्या तिमाहीचे रिझल्ट

करोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या सर्वच सेक्टरला पुन्हा एकदा उभारी मिळत आहे. त्यातच ऑनलाईनला मागणी वाढल्याने माहिती-तंत्रज्ञान सेक्टर तर पुन्हा पूर्वपदावर येत आहे. अशावेळी आता दुसऱ्या तिमाहीतील रिझल्ट जाहीर होणार असल्याने मार्केटचे लक्ष त्याकडे लागले आहे.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसचे रिझल्ट दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर होणार आहेत. तर, इन्फोसिस कंपनीचे रिझल्ट्स १४ ऑक्टोबरला जाहीर होतील. कंपन्यांनी पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्याचे यामुळे अधोरीखीत होऊन बाजारात चैतन्य येण्याची शक्यता त्यामुळे आहे.

एकूण रेव्हेन्यू आणि नफा यांना फटका बसल्याने बॅकफूटवर आलेल्या कंपन्यांनी आता मागील तीन महिन्यात उत्तम कामगिरीकडे पुन्हा मार्गक्रमण केले आहे. त्याचे चित्र रिझल्टमध्ये उमटणार असल्याने इन्व्हेस्टर मंडळी त्याकडे लक्ष ठेऊन आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here