असे बनवा ज्वारीचे डोसे; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

तुम्ही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील पण स्पंच डोस, कट डोसा, पण ज्वारीचा डोसा खल्लाय का कधी? नसेल तर नक्की खा आणि इतरांनाही सांगा कारण यातून आपल्याला कॅल्शिअम, कबरेदके, प्रथिने मिळतात. म्हणजे हा डोसा चविष्ट तर आहेच, आरोग्यदायी सुद्धा आहे.अगदी कमी साहित्यात हा पदार्थ करता येतो.

साहित्य घ्या मंडळी :-
१) अर्धा वाटी ज्वारी
२) अर्धा वाटी उडीद डाळ 
३) अर्धा वाटी तांदूळ
४) पाव चमचा मेथी दाणे
आणि मीठ व तेल ते चवीप्रमाणे आणि गरजेपुरते

असे बनवा चविष्ट ज्वारीचे डोसे :-
१) सर्वात आधी ज्वारी धुवून घ्या व ७ तास भिजायला घाला.
२) तसेच तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास भिजायला घाला. अर्थातच वेगवेगली घाला. एकत्र भिजवायला घालण्याची चूक करू नका.
३) आता डाळ, मेथी दाणे व मीठ मिक्सरमध्ये मकक्स करून घ्यावे.
४) तसेच ज्वारी आणि तांदूळ वाटून घ्यावे. सर्व मिश्रण एकत्र करून जवळपास ८ तास ठेवा.
५) आता या मिश्रणात पाणी घाला. डोसे करता येईल इतकेच पाणी घालावे. ६)तवा तापवून थोडे तेल लावून डोसे करावेत.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here