असा बनवा खमण ढोकळा तेही घरच्या घरी; वाचा एका क्लिकवर

ढोकळ्याची रेसिपी काय सांगताय… ती काही विशेष गोष्ट नाहीये असे तुमच्या मनात असलेले तरीही बर्‍याचदा ढोकळा बनवताना फसतोच ना… मग पुन्हा करावासा वाटतो का? नाही ना… म्हणूनच ही रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय…तर चला घ्या साहित्य आणि लागा तयारीला
१) ढोकळ्याचे पीठ 

२) आले-लसूण-मिरची पेस्ट

३) हळद 

४) तिखट

५)  मीठ

६) साखर

७) थोडे दही

८)  सोडा
आता तुम्हाला ढोकळ्याचे पीठ कसे करायचे ते आधीच सांगते… ३ वाटी तांदूळ, १ वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तूरडाळ दळून घ्या…

१) ढोकळ्याचे पीठ रात्री कोमट पाण्याने भिजवून ठेवावे. फार घट्ट नाही, फार सैल नाही असे. 

२)  सकाळी त्यात हळद, मीठ, साखर, आले-लसूण-मिरची पेस्ट घालून मिक्स करावे.

३) ढोकळा पात्रात पाणी गरम करायला ठेवावे.

४) आता ज्या प्लेटमध्ये ढोकळा वाफवायचा आहे, त्याला तेल लावून त्यात या बॅटरमध्ये एक लहान चमचा सोडा (इनो) टाकून फेटून प्लेटमध्ये टाका.

५) २० मिनिटे स्टीम करा. बाहेर काढून त्यावर तेलाची फोडणी टाका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले थोडे फ्रेश खोबरे टाकून मस्तपैकी खाऊन बघा…लागला की नाही टेस्टी… टेस्टी लागला तर ही रेसिपी पुढे नक्कीच शेअर करा..

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here