तुम्ही सगळे मरा.. मी राहतो घरीच; ‘त्या’ भाजप आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर न पडण्यावर नेहमीच टीका होत असते. मुख्यमंत्री ठाकरेंनी ते घराबाहेर का पडत नाहीत, याचे अनेकदा स्पष्टीकरण देऊनही त्यांच्यावर विरोधी पक्ष टीका करतच असतो. यावेळीही भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला हानला आहे. ते म्हणाले की, पहिले म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या.. मी जबाबदारी घेतो. काही महिन्यानंतर म्हणाले, माझे कुटुंब .. माझी जबाबदारी.. अजुन काही महिन्यानंतर म्हणतील .. तुम्ही सगळे मरा.. मी राहतो घरीच!!…

नितेश राणे हे नेहमीच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका करत असतात. परंतु शिवसेनेकडून त्यांच्या कुठल्याच टीकेला प्रत्युत्तर येत नाही. यावेळी मात्र राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच लक्ष केले आहे. राणे यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतीक्रीया आलेल्या आहेत. दिपाली पाटील यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी ७ महिने घरात बसून स्वतःच्या कुटुंबाचीच जबाबदारी घेतली बाकी महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर!

विकास पवार यांनी म्हटले आहे की, फडणवीस साहेब आज राज्याचे प्रमुख नाहीत तरी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि जे आज सत्ता प्रमुख आहेत ते 8 महिने घरात बसून आहेत.

संपादन : अमित जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here