‘ते’ सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा; भाजपचे गृहमंत्र्यांना आव्हान

मुंबई :

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला लागलेले राजकीय वळण एम्सने दिलेल्या अहवालानंतर थांबेल, असे वाटत होते मात्र तसे होताना अजूनही दिसत नाही. अशातच मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी भाजपने ८००० खोटे अकाऊंट तयार केले होते, असे समोर आले. यावरून गृहमंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा’, असे आव्हान गृहमंत्री अनिल देशमुखांना दिले आहे.

भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, गृहमंत्री देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता एक अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. सुशांतसिंग प्रकरणीचे अनेक अहवाल समोर आले असले तरीही त्यावर अजूनही राजकारण चालूच आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here