म्हणून भाजपने दिला शिवसेनेला खोचक सल्ला; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज का करत नाहीत?

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर सध्या बिहार निवडणुका चर्चेत आहेत. बिहार निवडणुकांना घेऊन अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेनेला निवडणूक आयोगाने धक्का देत धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मनाई केली. तरीही शिवसेना बिहारमध्ये ३०-४० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर ‘सतत डिपॉझिट जप्त करून घेण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज का करत नाहीत’, असे म्हणत खोचक सल्लाकम टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हाणला.

विशेष म्हणजे बिहारच्या मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ७ उमेदवारांनी ३ ऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा आदी मतदारसंघात शिवसेनेची चांगली पकड आहे. तसेच मागील निवडणुकीत शिवसेनेला एकूण २ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. भातखळकर यांनी केलेल्या ‘डिपॉझिट जप्त’ या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here