‘त्या’ विषयावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले आहेत. साखर उद्योगातील अनेक आर्थिक अडचणी तसेच कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह अनेक विषय घेऊन फडणवीसांनी शहा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठीकाला महाराष्ट्रातून बैठकीवेळी भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राहुल कुल उपस्थित होते.

महाराष्ट्र हा साखर उद्योगाची खाण आहे. महाराष्ट्रात साखर उद्योगाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्लीत मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.     

यापूर्वीही साखर कारखाने ताब्यात असलेल्या भाजप नेत्यांना घेऊन जवळपास २ दिवस फडणवीस यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. आता दुसऱ्यांदा साखर उद्योगासंबंधी फडणवीसांनी शहा यांची भेट घेतली आहे.    

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here