कॉंग्रेसने आमदाराने कॉंग्रेसची केली भाजपशी तुलना; वाचा, नेमका काय घडला प्रकार

मुंबई :

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी तब्बल ८० हजार फेक अकौंट समाजमाध्यमांमध्ये सक्रीय करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सोशल मिडियावर सक्रीय केलेले ८० हजार फेक अकौंट भाजपने तयार केले, असाही आरोप होतो आहे. अशातच कॉंग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी स्वतःच्याच पक्षाची भाजपसोबत तुलना केली आहे. ‘कॉंग्रेसने IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, NDA याची स्थापना केली. तर भाजपने ८०००० फेक अकाउंट बनवले’, असे म्हणत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

कुणाल पाटील यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. संदीप जगधने यांनी म्हटले आहे की, जे 80,000 फेक अकाऊंट बनवू शकतात तर आपलं दुखणं लपवण्यासाठी व विरोधकांच्या व सर्वसामान्य जनतेच्या आंदोलनावर दबाव आणण्यासाठी फेक वेबसाईट नाही का बनवू शकत..?

या ट्वीटवर अनेक भाजपविरोधी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एकूणच राजकीय वातावरणाचा प्रभाव समाजमाध्यमांवर जाणवत असतो.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here