येत्या २-३ दिवसात होणार महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पाऊस; वाचा, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई :

आता मौसमी पाऊस कमी झाला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. दसऱ्यापर्यंत पाऊस कमी होऊन पिके लावायची वेळ येते. यावेळी मात्र पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच आता येत्या २-३ दिवसात पूर्व विदर्भ, मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी सांगितले की, पुढच्या 2-3 दिवसात कोकणासह मुंबई-ठाण्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

काही काळासाठी उकाडा तर काही वेळासाठी पाऊस असे एकूण वातावरण आहे. विचित्र पद्धतीने बदलणाऱ्या वातावरणामुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे आणखी पाऊस होणार असल्याच्या शक्यता आहेत.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here