महाविकासआघाडी मध्ये कोणी कोणाला विचारत नाही; ‘त्या’ उदाहरणाचा दाखला देत भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई :

महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होत असल्याची घटना समोर आली आहे. सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला पळवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी ‘महाविकासआघाडी मध्ये कोणी कोणाला विचारत नाही’ असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

राणे म्हणाले की, शिवसेना खासदार राऊतची किंमत शून्य असल्याचं मी अगोदरच जाहीर केले आहे. या बोक्याची मंत्रालय व समाजात काही किंमत नाही. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टीका करणं ही त्याची जुनी सवय. जिथे चर्चा होत नाही तिथे टीका होते, महाविकासआघाडी मध्ये कोणी कोणाला विचारत नाही.

यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब असल्याचेही ते म्हणाले.

संपादन :स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here