परतीच्या पावसाचे लागले वेध; पहा काय दिलाय स्कायमेटने अंदाज

परतीच्या मॉन्सूनला आता सुरुवात झालेली आहे. अशावेळी हस्त नक्षत्र आणि इतरांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अशावेळी स्कायमेटने अंदाज व्यक्त केला आहे की, आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा पुणे आणिइतर काही भागात पाऊस होईल.

स्कायमेट या हवामान अभ्यास करणाऱ्या खासगी संस्थेच्या अंदाजानुसारदि. ३ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत या एकूण चार दिवसात पुणे शहरात पाऊस होईल असे म्हटले होते. त्याचवेळी १३ ऑक्‍टोबरच्या दोन दिवसात पुन्हा पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाच्या मार्गात झालेल्या वातावरणातील बदलामुळे याकालावधीत पाच दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे.

फ़क़्त शनिवारी (दि.१०) पुणे शहरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याचा अंदाज आता त्यांनी वर्तविला आहे. यंदा मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यातही शहरात विविध ठिकाणी परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील उकाडा वाढत असल्याने, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अशावेळी पावसाचे वेध सर्वांना लागले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगले झोडपले आहे. अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे पिक धोक्यात आलेले आहेत. अशावेळी आणखी किती आणि केंव्हा पाउस होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण, पेरणी झालेल्या क्षेत्राला आणि जिथे पाऊस झालेला नाही अशा ठिकाणी पावसाची गरज असतानाच जास्त पाऊस झालेल्या भागातील पिक या पावसामुळे पुन्हा एकदा संकटात येण्याची शक्यात आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here