ब्रेकिंग : ‘त्या’ नेत्यावर राजद्रोहाचा गुन्हा; हाथरसप्रकरणी युपी सरकार झाले आक्रमक..!

उत्तरप्रदेश म्हणजे प्रश्नप्रदेश असल्याचे म्हटले जात असतानाच आता येथील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सरकारने हाथरस प्रकरणाबाबत एक महत्वाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये पत्रकार आणि राजकीय नेत्यांवर थेट राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

हाथरस येथील चंदाप्पा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर यांच्यासह ६८० जाणवणार कलम १४४ चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच १३ सोशल मिडिया खात्यांच्या माध्यमातून अफवा पसरविणे आणि सामाजिकदृष्ट्या तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्याचे त्यात म्हटले आहे.

एडीजी प्रशांत कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार इंस्पेक्टर अवधेश कुमार यांच्या माहितीनुसार ही केस दाखल करण्यात आलेली आहे. परदेशाच्या मदतीने या भागातील शांतता धोक्यात आणण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्यानुसार पत्रकार आणि राजकीय नेत्यांवर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केल्याचे बातमीत म्हटले आहे. गुन्हा नेमका कोणावर दाखल झाला ही नावे समजली नाहीत. अज्ञात व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here