मुख्यमंत्री आदित्यानाथ म्हणजे किम जोंग आणि..; पहा कोणी केलीय ‘ही’ जहरी टीका

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यानाथ यांच्या सरकारवर सध्या कॉंग्रेस पक्षाने जोरदार टीकेची झोड उठवली आहे. हाथरस प्रकरण आणि त्यावेळी पोलिसांनी केलेला संशयास्पद हस्तक्षेप यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी कॉंग्रेस पार्टीच्या एका नेत्याने मुख्यमंत्री आदित्यानाथ म्हणजे किम जोंग असे म्हटले आहे.

राजस्थानात हाथरस प्रकरणात कॉंग्रेसतर्फे मुक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी राजस्थान विधानसभेतील कॉंग्रेसचे प्रतोद महेश जोशी म्हणले की योगी यांची सारी वर्तणुक उत्तर कोरियाच्या हुकुमशहा सारखीच आहे. अदित्यनाथ यांची तुलना राजस्थानातील कॉंग्रेसने उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्याशी केली असल्याने त्यांची ही बातमी खूप व्हायरल होत आहे.

जोशी म्हणाले की, पीडित मुलीचा मृतदेह रात्रीत जाळून टाकला आणि पीडित परिवाराला पुर्ण दहशतीखाली ठेवले. असा प्रकार देशात पुर्वी कधी झाला नव्हता. उत्तर कोरियात किम जोंग जे करीत आहे ते पाहूनच योगी तशा प्रकारचा कारभार उत्तरप्रदेशात करीत आहेत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here