पावसाळी अधिवेशनात गोंधळ चालू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कृषी सुधारणा विधेयके मंजूर करून घेतली. त्याच्याच विरोधात आता पंजाब, हरियाना आणि इतर भागातील शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. तर, यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदारपणे टीका केली आहे.
पंजाबमधील भवानीगड येथून समानापर्यंत ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली. राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते. त्यामध्ये सहभागी झाल्यावर शेतकऱ्यांना संबोधित करताना गांधी म्हणाले की, हे सरकार गेल्या सहा वर्षांपासून गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक आक्रमण करत आहे. यांची एकही नाही अशी नाही, की जिचा गरिबांना फायदा होईल.
मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. नोटाबंदीनंतर जिएसटी कायदा आणला, आता तुम्ही कुण्याही एखाद्या छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला विचारा, जीएसटीमुळे काय झाले. अद्यापही छोट्या दुकानदाराला अथवा व्यापाऱ्याला जीएसटी समजलेला नाही. हे कायदेही मंजूर कारताना एवढी घाई कशाची होती, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
संपादन : सचिन पाटील
- 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा काय आहेत ताजे दर
- म्हणून अण्णा हजारेंनी केले मोठे विधान; ‘मला मरणाची भीती नाही’
- ब्लॉग : अर्णवच्या पुढे दोन, मागे दोन.. मग सांगा किती अर्णव आहेत ते..!
- ‘त्या’ महत्वाच्या गावासाठी दोन्ही राजे पुन्हा भिडले; बघा, कोणत्या राजाला मिळाला कौल
- ‘त्या’ गावात माजी आमदार आणि पत्नीचे पॅनल होते एकमेकांविरुद्ध; ‘असा’ लागला ऐतिहासिक निकाल