चक्कर येत असल्यास ‘हे’ आहेत घरगुती उपाय; वाचा आणि शेअर करा

आपल्याला अनेकदा नकळत चक्कर येते. काहींना अशक्तपणामुळे तर काहींना ऊन सहन नाही झाले तर येते. रक्तदाब कमी झाल्यावर सुद्धा चक्कर येते. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही चक्कर येण्यावर उपचार करू शकता.

१) अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंगा टाकून पाणी उकळा. मग ते पाणी थंड करून घ्यावे. मग प्यावे.
२) साधारणपणे २० ग्रॅम मनुका तुपात भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये काळे मीठ मिसळून घ्या. व मग ते मिश्रण खाल्ल्यास चक्कर यायची थांबते. 
३) तुळशीच्या पानांमध्ये मध किंवा साखर मिसळून हे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.
४) नियमितपणे नारळ पाण्याचे सेवन करावे. 
५) फळांचे ज्यूस प्यावे. फक्त ज्यूस बनवताना त्यात साखर आणि मसाला टाकू नये.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here