अशी बनवा नारळाची चविष्ट चटणी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन, भन्नाट आणि चविष्ट पदार्थ घेऊन आलो आहोत. आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची चटणी खाल्ली असेल. नारळाचीसुद्धा खाल्ली असेल पण ही थोड्या हटके पध्दतीने बनवलेली चटणी खाल्ली तर बोटे चाटत बसाल, इतकी चविष्ट आहे.
तर साहित्य घ्या मंडळीहो…

१) दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस

२) ५ हिरव्या मिरच्या

३) लसणाच्या ५ पाकळ्या

४) २ चमचे फुटाणे

५) तेल

६) १ चमचा मोहरी

७) कोथिंबीर 

८) आले

९) ५-७ कढीपत्ता पाने

१०) अर्धा चमचा धनेचवीपुरते मीठ
हे साहित्य घेतले असेल तर कृती अगदीच सोपी आणि कमी वेळेची आहे. 

१) नारळाचा कीस, मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, मीठ, फुटाणे, साखर, कोथिंबीर हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. 

२) गॅसवर कढई ठेवून तेल गरम करा.

३) गरम तेलात मोहरी, कढीपत्ता, धने टाकावे. 

४) मोहरी चांगली तडतडली आहे असे लक्षात आले की त्यामध्ये वाटलेले मिश्रण घालावे.
झाली तुमची चवदार नारळाची चटणी तयार….ही नारळाची चटणी इडली, घावन याबरोबर छान लागते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here