रिटेल क्षेत्रात अंबानींपेक्षाही मोठा धमाका करणार टाटा; वाचा अधिक

मुंबई :

रिटेल क्षेत्रावर अंबांनी आणि रिलायन्स समूहाने एकहाती ताबा मिळवल्यासारखी परिस्थिती आहे. अशातच टाटांनीही एक पाऊल पुढे टाकत रिटेल क्षेत्रात नवा धमाका करण्याची तयारी केल्याची चिन्हे दिसत आहेत. येणाऱ्या काही महिन्यात टाटा उद्योग समूह एक सुपर अॅप आणत असल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या प्रसिद्ध असणाऱ्या वी चॅट या अॅप सारखं अॅप टाटा समूह आणण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे टाटा समूह या अॅपसाठी वॉलमार्ट किंवा फ्लिपकार्टची साथ घेऊ शकते. ब्लूमबर्गच्या हवाल्याने महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट टाटा सन्समध्ये २५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

अंबांनिंच्या तुलनेत टाटांची ताकद मोठी आहे. टाटांकडे चहासाठी लागणाऱ्या पावडरपासून तर कारपर्यंत अनेक उत्पादने आणि १०० पेक्षा जास्त व्यवसाय आहेत. पुरवठा साखळी आणी वितरण व्यवस्था यात एक पाऊल का होईना टाटा समूह पुढे आहे. परंतु जिओकडे असणारे ४० कोटी युझर्स ही रिलायन्स समूहाची ताकद आहे.

काय असेल टाटाच्या सुपर अॅपमध्ये :-

फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे अनेक व्यवसाय एकाच छताखाली आणण्यासाठी टाटा हे सुपर अॅप बनवत असल्याची माहिती आहे. तसेच डिजिटल कंटेंट आणि शैक्षणिक कंटेंटही या सुपर अॅपमध्ये उपलब्ध असेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here