नगरमध्ये ‘या’ पक्षाची गांधीगिरी; खराब रस्त्याला दिले खासदाराचे नाव

अहमदनगर :

जो माणूस नगरमध्ये गाडी चालू शकतो तो जगात कुठंही गाडी चालवू शकतो, असं म्हटलं जातं, ते खरंच वाटायला लागतं जेव्हा आपण नगरच्या रस्त्याने प्रवास करायला लागतो. नगर आणि खड्डे हे एक अतूट समीकरण आहे, असेच नगरच्या रस्त्यावरून प्रवास करताना वाटते. नगरच्या मनसेने हाच मुद्दा लक्षात घेत आक्रमक आंदोलनाची स्टाईल सोडून थेट गांधीगिरी करत रस्त्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. वारंवार मागणी करूनही नगरमधील काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे, या खराब रस्त्याला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव मनसेने आंदोलन केले.

या आंदोलनावेळी मनसेने स्पष्ट केले की, या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितीला खासदार विखे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव या रस्त्याला दिल्याचे मनसेने स्पष्ट केले. पुढे मनसेने इशारा दिला आहे की, हा रस्ता खासदार निधीतुन करावा किंवा दलित वस्ती निधीतुन करावा, हा महापालिकेचा प्रश्न आहे. पण महापालिकेने काटवन खंडोबा रोडचे काम ताबडतोब मार्गी लावावे, अन्यथा मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here