समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; जाणून घ्या त्यांच्याविषयी

दिल्ली :

वयाच्या ९२ व्या वर्षी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. जवळपास सलग २० वर्षे विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. वयाच्या २१ व्या वर्षी गावाचे सरपंच बनलेले मुलायम सिंह हे समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या जवळचे मानले जायचे. दोघांच्या नावात साधर्म्य असल्याने अनेकदा संभ्रम निर्माण व्हायचा.

औरय्यामधील कढोरचा पुरवा येथे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ते दोन वेळा औरय्याच्या विकासखंड भाग्यनगरचे तालुका अध्यक्ष देखील होते. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करत आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले की, मुलायम सिंह यादव यांनी नेहमीच शेतकरी, गरीब आणि असहाय लोकांसाठी आपला आवाज उठवला. त्यांचे शहरात कोणतेही घर नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावात अगदी साधेपणाने घालवले” असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here