पंतप्रधानांचा पुणेकर ‘मित्र’ जेईई अॅडव्हान्स परीक्षेत देशात पहिला; वाचा अधिक

पुणे :

जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत देशातील 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फलोरने देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. चिरागने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘बाल पुरस्कार प्राप्त असलेला माझा मित्र चिराग फलोरला भेटा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धांचा तो विजेता आहे. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. चिरागचे भविष्य उज्ज्वल आहे आणि मी त्याला यशासाठी शुभेच्छा देतो.

खरोखरच उज्ज्वल भविष्य असणाऱ्या चिरागने 396 पैकी 352 गुण मिळवले आहेत. कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीने सामान्य श्रेणीत 17 वा आणि महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला. तिला 396 पैकी 315 गुण मिळाले आहेत. सध्या देशभरातून चिरागचे कौतुक होत आहे. पंतप्रधानांचा मित्र अशीही ओळख असलेला चिरागने आता आपली ओळख स्वकर्तुत्वातून निर्माण केली आहे.    

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here