काँग्रेसचा ब्रेन असलेल्या ‘या’ नेत्याच्या १४ ठिकाणांवर सीबीआयचा छापा, ५० लाख रुपये जप्त

दिल्ली :

कॉंग्रेसचे ‘ब्रेन’ असलेले आणि आक्रमक चेहरा असलेले कर्नाटकचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे घातले आहेत. एवढंच नाही तर त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्याही काही ठिकाणांवर छापे घालण्यात आले आहेत. आतापर्यंत १४ ठिकाणी मारलेल्या छाप्यामध्ये  50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीबीआयने अजूनही छापेमारी सुरूच ठेवली असल्याचीही माहिती मिळत आहे. डीके शिवकुमार यांच्या दिल्लीतील सफदरजंग परिसरातही असणाऱ्या घरावरसुद्धा छापा मारण्यात आला आहे. त्याशिवाय कर्नाटकमधील 9, दिल्लीतील 4 आणि मुंबईतील एके ठिकाणी छापा मारण्यात आला. अजूनही काही ठिकाणी सीबीआय छापा मारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या केसनुसार उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीवर छापेमारी झाली आहे.

कॉंग्रेस नेत्यांच्या घर आणि संपत्तीवर छापे मारल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत घातलेल्या छाप्यात ५० लाख रुपयांची रोख रक्कम सीबीआयला सापडली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here