आता तृतीयपंथी, लेस्बियन सुद्धा होणार महाविकास आघाडीतील ‘त्या’ पक्षाचे कार्यकर्ते; वाचा, काय आहे प्रकार

मुंबई :

महाराष्ट्रात पुरोगामी पक्ष म्हणून वावर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं एक मोठं पाऊल उचलत पुरोगामी असल्याची असल्याची आणखी एक खूण कायम केली आहे. तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षांने आता नव्याने ‘एलजीबीटी’ (गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटरवरून दिली आहे. त्यामुळं आता तृतीयपंथी, समलिंगी लोकही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दिसणार आहेत.

आज मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एलजीबीटी या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सर्वच पक्षांमध्ये डॉक्टर, वकील, ओबीसी आणि ईतरही प्रकारचे सेल असतात. परंतु समलिंगी आणि तृतीयपंथी लोकांसाठी सेल चालू करणारा राष्ट्रवादी हा राज्यातील कदाचित पहिलाच पक्ष असावा. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार हा सेल सुरू होणार असल्याची माहिती ट्वीटरवर मिळाली आहे. एल. जी. बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नविन सेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here