म्हणून ‘या’ पक्षाध्यक्षांनी केला सवाल; मोदींच्या आरोग्यावर परिणाम झालाय का?

मुंबई :

नुकत्याच झालेल्या अटल टनेल च्या उद्घाटनाप्रसंगीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे ते ट्रोल होतानाही दिसत आहेत. सुरक्षितता आणि कोरोनाच्या संकटामुळे या उद्घाटनाला सेक्युरिटी, काही अधिकारी आणि कॅमेरामन सोडता कुणीही उपस्थित नव्हते. संपूर्णपणे मोकळ्या असलेल्या टनेलमध्ये मोदिजी मात्र हात हलवताना दिसत होते. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘सुनसान टनेलमध्ये हात हलवणाऱ्या मोदींच्या आरोग्यावर परिणाम झालाय का?, असा सवाल केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, निर्मनुष्य बोगद्यात पंतप्रधान कोणाला पाहून हात हलवत होते? तेथे जनता उपस्थित नव्हती. देशाला आर्थिक दुर्दशाच्या मार्गावर नेलेल्या आत्ममग्न पंतप्रधानांच्या आरोग्यावर काही परिणाम झाला आहे काय? पंतप्रधानांच्या आरोग्यविषयक जनतेला माहिती मिळायला हवी. बरं, आदरणीय मोदींनी यापूर्वीही असं बर्‍याचदा केलं आहे.         

कालचे सर्वच फोटोंमुळे मोदी देशभरात ट्रोल होताना दिसत आहे. एका बाजूला देशाची अशी अवस्था असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पब्लिसिटीत व्यग्र असलेले पंतप्रधान देशाला लाभलेत, अशा आशयाची टीका मोदींवर होत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here