अजून खूप बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजवू नका; ‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेत्याचा शिवसेनेला सल्ला

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला लागलेले राजकीय वळण आता थांबलेले आहे. एम्सने दिलेल्या अहवालात सुशांतसिंगची हत्या झालेली नसून ही आत्म्हत्याच असल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेनेनं मुंबई पोलीसांवर आरोप करणाऱ्यांना चांगलच झापलं आहे. आजच्या अग्रलेखातही शिवसेनेनं मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्यांसह एकांगी भूमिका घेणाऱ्या माध्यमांना सुनावले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘अजून खूप काही बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजवू नका’, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे.

राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.

या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अमर वारीशे यांनी म्हटले आहे की, शिवसेना नेते व माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडून रिया चक्रवर्ती पवना धरण परिसरात जमीन खरेदी करत होती. त्यामुळे ती शिवसेनेच्या संपर्कात होती अस सुशांतच्या जवळच्या मित्राने सांगितले.

योगेश शिंगटे यांनी म्हटले आहे की, काही दिवसांनी सीबीआयच्या गाण्यांवर सेनेला नाचाव लागणार आहे. शोले सिनेमातल्या बसंती सारखी शिवसेनेची अवस्था होणार आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here