मुंबई :यावर्षी आलेल्या कोरोना या वैश्विक संकटांमुळे ‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवार्ड’ यंदा ऑनलाईन पध्दतीचा वापर करत पार पडला. या फिल्म फेस्टिव्हल मधील ‘कोयता एक संघर्ष’ या चित्रपटातील प्रमुख नकारात्मक भूमिका साकारण्यारे नगरचे भूमिपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते प्रकाश धोत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सध्या प्रकाश धोत्रे हे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठी चॅनलवर असणाऱ्या टीव्ही सिरीयलसाठी काम करत असून आजवर त्यांनी अनेक 100 पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
मोठी सरकारी नोकरी असतानाही सुरुवातीपासून कामाशी असणारी एकनिष्ठता आणि अभिनयाची असलेली ओढ यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाल्याचे धोत्रे यांनी सांगितले.नगरमध्ये सरकारी नोकरीत असूनही धोत्रे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत खंड पडू दिला नाही. “बापू बिरु वाटेगावकर” या चित्रपटातुन त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. विशेष म्हणजे धोत्रे यांनी मराठीसह भोजपुरी आणि हिंदीतही काम केलेले आहे.
25 वर्षांपेक्षा जास्त नाटक क्षेत्रातील अनुभव असल्यामुळे आजही ते नाटक करतात. मराठीतील प्रसिध्द असणारे ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात त्यांनी घाशीरामची भूमिका उत्तमपणे वठवली आहे. दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवार्ड हा नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार प्राप्त झाल्यावर धोत्रे यांनी सांगितले की, आजवर माझ्या वाटेला अनेक नकारात्मक भूमिका आल्या. मला याच नकारात्मक भूमिकांमुळे महाराष्ट्रात ओळख मिळाली. पुरस्कार प्राप्त झाला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझा नसून ‘कोयता एक संघर्ष’ चित्रपटाच्या टीमचा आहे. तसेच मायबाप रसिक प्रेक्षकांचा आहे.
संपादन : संचिता कदम
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव