बिहारमध्ये शिवसेना देणार टक्कर; पहा किती जागांवर लढणार सेनेचे ‘वाघ’..!

भाजपशी असलेला घरोबा तुटल्याने शिवसेना आणखी आक्रमक आणि स्वतंत्र झालेली आहे. त्याच शिवसेनेने आता बिहारच्या निवडणुकीत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना घाम फोडण्यासाठी उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

बिहारमधील कार्यकर्त्यांच्या आग्रहाने त्या राज्यात किमान 50 जागांवर उमेदवार देण्याची पक्षाने तयारी केली आहे. त्यासाठी बिहारमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती.  शिवसेना बिहार विधानसभेच्या 50 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची सुत्रांनी दिली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे, तिथे दुसरे चिन्ह घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत शिवेसेना आहे. नीतिशकुमार यांच्या सरकारने मूळ प्रश्न बाजूला ठेऊन सुशांत सिंग राजपूत याच्या प्रकरणावरुन कसे राजकारण केले, हाच शिवसेनाच्या तिथल्या प्रचाराचा अजेंडा असणार आहे.

सन 2015 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बिहारमध्ये 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राज्यात शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. उमेदवार मात्र एकही निवडून आला नाही. हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाचे मतदान मिळाले होते. त्यातही विशेष म्हणजे एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती.

शिवसैनिक निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. बिहारमधील कमीत-कमी 50 जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे. शिवसैनिकांची मागणी संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळे आता निवडणुक लढवायची की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली असे बिहारचे राज्यप्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here