बिहारमध्ये NDAत उभी फूट; केंद्रीय मंत्र्यांच्या पक्षानेच सोडली साथ, वाचा कशी फिरली चक्रे

पटना :  

सध्या देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणुका फोकस करून सगळ्या घडामोडी घडत आहेत. विशेषकरून राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडताना दिसत आहेत. एकूणच दावे पक्ष आपापल्या अटींवर एकत्र आलेले आहेत तर NDAत मात्र अजूनही एकोपा दिसत नाही. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बिहारमध्ये NDAत उभी फूट पडली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा पक्ष NDAमधून बाहेर पडला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पासवान यांच्या जेडीयू पक्षात मतभेद वाढले आहेत. रामविलास पासवान आजारी असल्याने चिराग पासवान यांनी पक्षाची बैठक घेत NDAतून त्यांचा पक्ष LJP (लोक जनशक्ती पार्टी) बाहेर पडत असल्याचा हा निर्णय सांगितला. सध्या चिराग हे सर्व पक्षाची सूत्रे सांभाळत आहेत. नितीशकुमार यांचे नेतृत्व पक्षाला मान्य नाही, त्यामुळे LJP सेपरेट निवडणूक लढविणार आहे. मात्र भाजपची साथ LJP ने सोडली नसल्याचेही सांगितले जात आहे.

आधीपासूनचे काही मतभेद आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्यावरून पासवान आणि नितीशकुमार यांच्यात फाटले आहे. आता बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न कसा सोडवतात, हे पाहणे महत्वाचे आहे.          

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here