‘असं’ असताना सरकार काय करताय; आक्रमक संभाजीराजेंचा सरकारला सवाल

कोल्हापूर :

मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षण हा चर्चचा विषय ठरत आहे. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘014 नंतर ESBC आरक्षण आणि त्यानंतर SEBC आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या अनेकांना ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही. असं असताना सरकार काय करताय. तुमच्या हातात जे आहे ते आधी करा’, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

यावेळी ते मराठा अरक्षणसाठी आयोजित न्यायिक परिषदेत बोलत होते. सदर परिषद कोल्हापूर येथे भरली होती. या परिषदेत अनेक मान्यवर, नेते तसेच ५ जिल्ह्यातील वकीलही उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मराठा आरक्षणाविषयी आपली मते मांडली. ‘मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा’, असेही आवाहन यावेळी संभाजीराजेंनी केले.

यावेळी पुढे बोलताना संभाजीराजेंनी ‘इडब्युएस आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?’, असा सवालही उपस्थित केला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here