पांडेजींनी पकडला अफलातून झेल; ‘त्या’ खेळाडूला परतावे लागले तंबूत, पहा व्हिडीओ

मुंबई :

सध्या पांडेजी फोर्ममध्ये आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण करत मनीष पांडेने पकडलेल्या झेलची चर्चा सोशल मिडीयावर जोरात सुरु आहे. संदीप शर्माने गोलंदाजी करत असताना एका बॉलवर इशानने दमदार शॉट मारला होता. परंतु पांडेजी ऑन ड्युटी असल्यामुळे वेगाने डाइव्ह घेत झेल पकडला. धुवांधार फलंदाजी करणारा इशान झेलबाद होत तंबूत परतला.

आजचा आयपीएल २०२०चा १७वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन संघामध्ये झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना रंगला. सामन्याची अनेक वैशिष्ट्ये असतानाही पांडेजींनी पकडलेल्या झेलची चर्चा जास्त होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्तम अशी खेळी करत मुंबई इंडियन्सने २० षटकात २०८ धावा केल्या. रोहितने लवकरच तंबू गाठला. त्यानंतर लागोपाठ आलेले फलंदाज कमी धावा करत बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेला ईशान मात्र धुवांधार फलंदाजी करत होता. २३ चेंडूत १३४.७८च्या स्ट्राईक रेटने ३१ धावा कुटल्या. पण डावातील १५व्या षटकातील शेवटचा चेंडूला त्याने मारलेला शॉट पांडेजींनी रोखला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here