गुड न्यूज : ‘ती’ कंपनी देणार ७० हजार रोजगार; पहा कोणाला करायचा संपर्क ते

करोना विषाणू आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे  देशभरात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्या टिकल्या आहेत मात्र पगारात मोठी घट झालेली आहे. अशावेळी ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्म असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीने देशात ७० हजार नव्या नोकऱ्या देण्याची तयारी केली आहे.

सणासुदीच्या कालावधीत नवे ग्राहक जोडण्यासह रिलायन्स आणि अमेझॉन यांना टक्कर देण्यासाठी ही कंपनी सज्ज झालेली आहे. त्यासाठी त्यांनी सप्‍लाई चेनमध्ये डिलीवरी एग्‍जीक्‍यूटिव्‍स, पिकर्स, पैकर्स आणि सॉर्टर्स यांची पदभरती सुरू केलेली आहे. यासह सेलर्स पार्टनर आणि किराणा दुकाने यांच्यामध्येही यानिमित्ताने रोजगार मिळणार आहेत. कंपनी ज्यांना रोजगार देणार आहे त्यांना प्रशिक्षणही देणार आहे. असा हा आकडा किमान ७० हजार होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

देशभरात या कंपनीने ५० हजार किराणा दुकादारांना जोडून घेतले आहे. त्याद्वारे त्यांच्या डिलिव्हरी आणि विक्रीचे नियोजन जोमात सुरू आहे. दि. १६ ते २१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज (BBD) सेल चालू असणार आहे. या नोकऱ्या मिळण्यासाठी नजीकचे दुकानदार, विक्रेते आणि कंपनीच्या वेबसाईट यावर संपर्क साधून साधी साधण्याची आवश्यकता आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here