‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांनी मिळवले भ्रष्ट मार्गाने घबाड; पहा कोणते ६ अधिकारी आहेत रडारवर

पोलीस आणि गुन्हेगार यांच्या साटेलोटेपूर्ण संबंधांच्या अनेक सुरस कथा आपण ऐकतो. एखादा चांगला आणि विचारी पोलीस अधिकारी सापडणे हा नियम नाही तर अपवाद बनल्याची परिस्थिती आहे. अशाच पोलीस जगतातील बेस्ट ग्रोथ अचिव्ह करणारे ६ अधिकारी सध्या रडारवर आहेत.

हे काही आपल्या विचारी आणि विकसित म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रशासकीय कर्तव्यदक्षतेचे उदाहरण नाही. हे आहे उत्तरप्रदेश राज्यातील कारवाईचे वास्तव. आपल्याकडे तर याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. मात्र, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या राज्यातील मेरठ येथील अधिकारी सध्या रडारवर घेण्यात आलेले आहेत. त्याद्वारे स्पष्ट झाले आहे की, त्यांनी मोठे घबाड जमा केले आहे.

गेल्या चार ते पाच वर्षात पेट्रोल पंप, आलिशान बंगला, करोडोंची जमीन खरेदी केली, पत्नीसह इतर नातेवाईकांच्या नावावरही संपत्ती खरेदी केलेल्या सिंघम अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. हस्तिनापूरचे निलंबित पोलीस स्टेशन अधिकारी धर्मेंद्र सिंह यांचा शास्त्री नगर भागात फ्लॅट आणि आलिशान फार्म हाऊस असल्याचे यातून स्पष्ट झालेले आहे.

पोलीस स्टेशन प्रभारी झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांची लाइफ स्टाइल बदलून  दुचाकी किंवा सामान्य वाहनातून फिरणारा अधिकारी लक्झरी वाहनातून खाली उतरत नाही. नेत्याच्या अथवा वरदहस्ताच्या संरक्षणात हे सगळे राजरोस कमावले जाते. अशाच महत्वाच्या अधिकाऱ्यांची चौकशी चालू असल्याचे राजीव सभरवाल (एडीजी मेरठ झोन) यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here