नरेंद्र मोदींचे सरकार ‘ते’ चालवतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

मोगा :

कृषी कायद्यांविरोधात कॉंग्रेस प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कॉंग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसशासित राज्यांना कृषी कायद्यांना पर्याय शोधा, अशा सूचना केल्या आहेत. राहुल गांधींनीही पुढे येत ‘खेती बचाओ’ अभियान सुरु केले आहे. यावेळी पंजाबमध्ये अभियानात संबोधित करत असताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारचा एमएसपी संपवण्याचा इरादा आहे आणि शेतीचा संपूर्ण बाजार अंबानी आणि अदाणी यांच्या हवाली करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही.

पुढे त्यांनी मोदींवर टीकास्र सोडत म्हटले की, देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, मात्र ते चुकीचे आहे, देशात मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदाणी यांचे सरकार आहे. पुढे बोलताना त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला. ‘नरेंद्र मोदी यांना अंबानी आणि अदाणी चालवतात, जीवन देतात. यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला जातो’, असाही गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे.

काँग्रेस सत्तेत येईल त्या दिवशी तिन्ही कृषीबाबतचे काळे कायदे कचऱ्याच टोपलीत फेकून देऊ, असे आश्वासनही यावेळी राहुल यांनी दिले. एकूणच थंड पडलेली कॉंग्रेस आता आक्रमक झाली आहे. तसेच योग्य मुद्द्यावर आणि योग्य वेळी आक्रमकता दाखवल्याने सरकारवर दबाव पडत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here